About Jobwala
स्वस्तिक रोटोमॅटिक आणि जॉबवाला यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची गॅरंटी दिली जात आहे. सदर प्रशिक्षणाची माहिती खालील प्रमाणे आहे.
प्रशिक्षणाची माहिती
वेल्डर कम फिटर
प्रशिक्षण कालावधी 10 दिवस.
याप्रकारच्या प्रशिक्षणामध्ये Extrusion आणि Moulding इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये 20% थेअरी आणि 80% प्रॅक्टिकल असणार आहे.
शिक्षण:- किमान इयत्ता 10 वी.
प्रशिक्षण फी:- रुपये 2000/-
प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जे विद्यार्थी नोकरीची किमान तीन महिने पूर्ण करतील त्यांना रुपये 1000/- परत केले जातील.
प्रशिक्षणाचे ठिकाण:- अक्कलकोट रोड एमआयडीसी सोलापूर.
WhatsUp Us
मशीन ऑपरेटर
प्रशिक्षण कालावधी 30 दिवस.
याप्रकारच्या प्रशिक्षणामध्ये Extrusion आणि Moulding इंडस्ट्रीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रोडक्शनचे सर्व प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाणार आहे. यामध्ये 20% थेअरी आणि 80% भाग प्रॅक्टिकलचा असणार आहे. भविष्यात पात्र विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते.
शिक्षण:- किमान इयत्ता 10 वी.
प्रशिक्षण फी:- रुपये 3000/-
प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जे विद्यार्थी नोकरीची किमान तीन महिने पूर्ण करतील त्यांना रुपये 1500/- परत केले जातील.
प्रशिक्षणाचे ठिकाण:- चिंचोली एमआयडीसी सोलापूर.
गरजूंनी अर्ज, आधार कार्ड, फोटो आणि फीच्या रकमेसह खालील पत्त्यावर दुपारी
4 ते 6 या वेळेमध्ये प्रत्यक्ष भेटावे.
WhatsUp Us
मुलाखत मार्गदर्शन
आम्ही गेली 20 वर्षे या क्षेत्रात काम करत आहोत. अनुभवातून आम्हाला असं जाणवलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असते पण नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करणं, नोकरी शोधण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न करणं, मुलाखत देणं आणि नोकरी मिळाली तरी तिथं स्थिर स्थावर होणं इत्यादीसाठी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाचा त्यांच्याकडे अभाव असतो. जरी आत्मविश्वास असला तरी नोकरी मिळविण्यासाठी त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. म्हणून ही गरज ओळखून आम्ही त्यांच्यासाठी मुलाखत मार्गदर्शन आणि एकूणच नोकरीविषयक मार्गदर्शन करण्याचं काम करतो. नोकरी मिळविण्याचं हे शास्त्र समजून घेता यावं यासाठी आम्ही आपल्या मार्फत महाविद्यालयात हा कार्यक्रम घेऊ इच्छित आहोत. सदर कार्यक्रमात खालील विषयांचा अंतर्भाव होतो.
1) नोकरी कशी शोधावी.
2) नोकरीच्या जाहिरातीमधून कंपनीचा अभ्यास कसा करावा..
3) नोकरीसाठी ऍप्लिकेशन कसे करावे..
4) बायोडाटा कसा लिहावा..
5) प्लेसमेंट कन्सल्टंटचे महत्व..
6) जॉब पोर्टलचे महत्व..
7) नोकरीसाठी आलेल्या फोनवर कसे बोलावे..
8) नोकरी कशी टिकवावी..
9) नोकरीमध्ये इन्क्रीमेंट आणि प्रमोशन कसे मिळवावे..
10) नोकरीच्या ठिकाणी स्वाभिमानाने कसे राहावे..
यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी....
.
अपॉइंटमेंट घेऊन भेटा.
चार्जेस रुपये 1000/-
WhatsUp Us